• Hw$S>m>iXoeH$a Jm¡S$ ~«m÷U gh`moJ, S>m>o§[~dcr

    Kudaldeshkar Gaud Brahman sahayog, Dombivli

    Registration No. A 877, Thane.

कुडाळदेशकर सहयोगचा इतिहास


    कुडाळदेशकर गौड ब्राह्मण सहयोग, डोंबिवली ह्या आपल्या संस्थेचा दि.२६ जानेवारी २०१६ ते २६ जानेवारी २०१७ ह्या कालावधीत सुवर्ण महोत्सव साजरा होत आहे. त्या निमित्ताने सहयोगचे ज्येष्ठ सदस्य श्री. न.ना. पंतवालावलकर, श्री. विकास पाटील व श्री. रविंद्र खानोलकर यांनी डोंबिवलीतील कुडाळदेशकर जातीचा व सहयोगचा शब्दबध्द केलेला इतिहास.


कुडाळदेशकर गौड ब्राह्मण सहयोग, डोंबिवली


सुवर्ण महोत्सवी वर्ष


१९६७ ते २०१७ - गौरवशाली ५० वर्षे


    कुडाळदेशकर गौड ब्राह्मण सहयोग, डोंबिवली ही संस्था १९६७ साली गुढीपाडव्याला स्थापन झाली. त्यापूर्वीच्या इतिहासाप्रमाणे सन १८८० साली कै. नारायणराव आत्माराम पाटकर डोंबिवलीत सर्व प्रथम आले. कै. नारायणराव ह्यांची ज्ञाती इतिहासात डोंबिवलीतील आमचा पहिला ज्ञातीबांधव म्हणूनच नोंद करावी लागेल. कै. नारावणराव धोरणी, उद्यमशील आणि महत्वाकांक्षी होते. पुढे जमिनजुमला, शेतीवाडी व व्यापार करुन ते येथे स्थायिक झाले. बैलगाडी व घोडा हेच त्यांचे दळणवळणाचे साधन होते. सन १८८७ साली डोंबिवलीचे रेल्वे स्थानक बांधण्यात आले. दळणवळणाचे साधन उपलब्ध नसल्याने डोंबिवलीची वस्ती फार काही वाढत नव्हती. १९२२ पर्यंत पहिली ४२ वर्षे कै. नारायणराव पाटकर हे आमचे एकमेव जाती बांधव डोंबिवली गावचे रहिवासी होते.


    दळणवळणाची गैरसोय असतानाही कै. नारायणराव पाटकर यांचे वरचेवर मुंबई येथे येणे-जाणे होते. त्यांनीच मुंबईतील अनेक ज्ञातीबांधवांना आकृष्ट करुन डोंबिवलीचा रस्ता दाखविला. कै. विठ्ठल आप्पाजी नेरूरकर (१९२२), कै. रघुनाथ जनार्दन पाटकर (१९२४), मे. रामचंद्र गोपाळ आणि कंपनीचे एक भागीदार कै. रामचंद्र गोविंद सामंत (१९२८) व कै. त्रिंबक जगन्नाथ पाटकर (१९२८) हे सुरुवातीच्या काळात त्यापैकी होते. त्यानंतर क्रमवार कै. गणेश विठ्ठल सामंत, कै. सखाराम विठ्ठल सामंत, कै. यशवंत विठ्ठल देसाई, कै. आत्माराम बाबाजी देसाई, कै. नरहरी बाबूराव वालावलकर, कै. सावळाराम आत्माराम सामंत, कै. नारायण महादेव नाईक, कै. बाळकृष्ण गोपाळ प्रभूकोचरेकर, कै. लक्ष्मण वामन तिरोडकर, कै. वि. स. गवाणकर, कै. भास्कर भिकाजी आजगावकर, कै. दत्ताराम रामचंद्र खानोलकर ही मंडव्ठी १९४० पूर्वी डोंबिवलीत आली. सन १९५१ सालापर्यंत ही जाती कुटुंबियांची संख्या वाढून सुमारे ३५ ते ४० च्या आसपास पोहचली होती.


    ज्ञातीबांधवांना आपल्या या डोंबिवली गावात ज्ञातीसंस्थेच्या नावाखाली एकत्र येऊन कार्य करावे याची मनोमन इच्छा निर्माण झाली. निव्वळ ज्ञाती प्रेमाने “गौड ब्राह्मण सभा- मुंबई ही डोळ्यासमोर ठेवून विशिष्ठ प्रेरणेने विजया दशमी १४ ऑक्टोबर सन १९५१ साली कै. नारायणराव पाटकर यांच्याच निवासस्थानी त्यांचेच चिरंजीव कै. डॉ. अनंत नारायणराव पाटकर यांच्या अध्यक्षतेखाली “गौड ब्राह्मण सभा, डोंबिवली ची स्थापना ज्ञाली. सध्याच्या काळात सर्वत्र स्त्री-पुरुष एकत्र येऊन वावरतात तसे त्या काळी येत नसत, कारण समाजव्यवस्था सर्वच जातींची तशी सुधारलेली नव्हती. अशा ह्या काळात ह्या संस्थेचे खरे जनक होते कै. यशवंत विठ्ठल देसाई मूळ कल्पना व प्रेरणा ही त्यांचीच होती. त्यांनी कै. सखाराम विष्णू देसाई, कै. काशीनाथ रघुनाथ पाटकर, कै. लक्ष्मण वामन तिरोडकर इत्यादी मंडळींना हाताशी धरुन ही संस्था स्थापन केली. स्वत: मात्र निरपेक्षपणे मंडळाच्या